अक्षय ऊर्जा- पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मध्ये विविध पदांच्या ३४ जागा
महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान (MAHAPREIT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज (ऑफलाईन) मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३४ जागा
कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, विक्री अधिकारी, व्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक महाव्यवस्थापक, सेवानिवृत्त तहसिलदार/ नायब तहसिलदार, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी, सेवानिवृत्त तलाठी, क्रेडिट विश्लेषक, सहाय्यक क्रेडिट विश्लेषक, सेवानिवृत्त सहकारी अधिकारी, सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रीत, महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड, बी- ५०१, ५०२, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या शेजारी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०० ०५१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!