अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदाच्या २७५ जागा

भारतीय सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण २७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक संचालक पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (प्रशासन, वित्त, मानव संसाधन विकास) आणि दक्षता खात्यातील प्रकरण हाताळण्यात सहा वर्षांचा अनुभव. किंवा कायद्याची पदवी आणि सरकार किंवा स्वायत्त संस्था किंवा संशोधन संस्था किंवा विद्यापीठे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा कायदा कंपन्यांकडून कायदेशीर बाबी हाताळण्याचा किंवा कार्य अधिकारी म्हणून कामकाजाचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

सहाय्यक संचालक (तांत्रिक) पदाच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र किंवा बायोकेमस्ट्री किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य विज्ञान व तंत्रज्ञान किंवा अन्न व पोषण किंवा खाद्य तेल तंत्रज्ञान किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा दुग्धशाळा तंत्रज्ञान किंवा कृषी किंवा बागवानी विज्ञान किंवा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषशास्त्र किंवा सार्वजनिक आरोग्य किंवा जीवन विज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान किंवा फळ आणि भाजीपाला तंत्रज्ञान किंवा अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता आश्वासन या विषयातून मास्टर्स पदवी धारण केली असावी.

तांत्रिक अधिकारी पदाच्या १३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र किंवा बायोकेमस्ट्री किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य विज्ञान व तंत्रज्ञान किंवा अन्न व पोषण किंवा खाद्य तेल तंत्रज्ञान किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा दुग्धशाळा तंत्रज्ञान किंवा कृषी किंवा बागवानी विज्ञान किंवा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषशास्त्र किंवा सार्वजनिक आरोग्य किंवा जीवन विज्ञान जैवतंत्रज्ञान किंवा फळ आणि भाजीपाला तंत्रज्ञान किंवा अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता आश्वासन या विषयातून मास्टर्स पदवी धारण केलेली असावी.

केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी पदाच्या ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातील फूड टेक्नॉलॉजी किंवा डेअरी टेक्नॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा ऑईल टेक्नॉलॉजी किंवा कृषी विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान किंवा बायो-केमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा वैद्यकीय पदवीची पदवी किंवा अधिसूचित कोणतीही इतर समकक्ष किंवा केंद्र सरकार मान्यताप्राप्त अर्हता धारण केलेली असावी.

प्रशासन अधिकारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवीसह ३ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

सहाय्यक पदाच्या एकूण ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी.

कनिष्ठ सहाय्यक (ग्रेड-I) पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

हिंदी अनुवादक पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातुन इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय इंग्रजी घेऊन पदव्युत्तर पदवी आणि हिंदी अनुवादक डिप्लोमासह हिंदी ते इंग्रजी अनुवाद करण्याचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

वैयक्तिक सहाय्यक पदाच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी किंवा लघुटंकलेखक (८० श.प्र.मि. ) आणि इंग्रजी टाइपिंग (४० श.प्र.मि.) व हिंदी टायपिंग (३५ श.प्र.मि.) आणि संगणक ओळख आवश्यक आहे.

सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील बी.टेक किंवा एम.टेक (संगणक विज्ञान) किंवा इतर संबंधित अभियांत्रिकी समतुल्य पदवी किंवा एमसीए किंवा पदवीसह किमान ५ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

सहाय्यक (आयटी) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एक वर्षाची पदव्युत्तर पदविका/ संगणक ऍप्लिकेशन किंवा माहिती तंत्रज्ञान पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी धारण केलेली असावी.

उपव्यवस्थापक सहाय्यक पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका (पूर्ण वेळ अभ्यासक्रम) किंवा पदवी पदव्युत्तर पदवी किंवा सामाजिक कार्यातील पदविका किंवा मनोविज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील श्रम आणि सामाजिक कल्याण या विषयातील मार्केटिंग मध्ये एमबीए किंवा ग्रंथालय विज्ञान किंवा संस्था किंवा ग्रंथालय आणि संस्थेची माहिती विज्ञान विषयातून पदवीसह ६ वर्ष अनुभव आवश्यक

सहाय्यक व्यवस्थापक  पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदव्युत्तर पदवी किंवा पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा जनसंपर्क विषयातून पदवी किंवा एमबीए किंवा सामाजिक कार्य किंवा पदविका किंवा सामाजिक कार्य किंवा कामगार आणि सोशल कल्याण किंवा ग्रंथपाल किंवा ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष किंवा १८ ते ३० वर्ष किंवा १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांना २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०१९ आहे. (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Visit us www.nmk.co.in 

 

Comments are closed.