आयबीएपीएस आयोजित लिपिक संवर्गातील सामाईक परीक्षा स्थगित झाली
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) च्या लिपिक संवर्गीय पदांच्या एकूण ५८३० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक परिक्षा स्थगित केली आहे. सदरील परीक्षा केवळ हिंदी व इंग्रजी माध्यमात घेण्यास काही राज्यांनी विरोध दर्शविला असून परीक्षेत प्रादेशिक भाषेचा पर्याय देण्याची मागणीही काही राज्यांनी केली असल्याने प्रादेशिक भाषेचा पर्याय देण्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
सदरील लिपिक संवर्गीय परीक्षा स्थानिक/ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात यावी, अशी काही राज्यांची मागणी असून यावर समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देऊन ही समिती येत्या १५ दिवसांत अर्थ मंत्रालयाला आपला अहवाल सादर करणार असून तो पर्यंत सदरील परीक्षेवरील स्थगिती कायम असेल. समितीच्या आलेल्या शिफारशीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असून त्यानंतरच परीक्षा घेतली जाणार असल्याचे, अर्थ मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे सांगितले आहे.
आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.