राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये विविध पदाच्या ७४ जागा
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
परिचारिका (ग्रेड- II) पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा बारावी उत्तीर्णसह जी.एन.एम. कोर्स आणि २ वर्ष अनुभव आवशयक आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण आवश्यक.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
ऑपरेटर (प्रशिक्षणार्थी) पदाच्या ५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह बी.एस्सी. (रसायनशास्त्र) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% गुण आवश्यक.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
बॉयलर ऑपरेटर (ग्रेड- III) पदाच्या १६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र किंवा आयटीआय/ बॉयलर अटेंडंट डिप्लोमा आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०१९ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.