रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन पदाच्या एकूण ७९८ जागा

भारतीय रेल्वेच्या सुरक्षा दलात विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन पदांच्या एकूण ७९८ जागा
कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) पदाच्या ४५२ जागा, कॉन्स्टेबल (सफाईवाला) पदाच्या १९९ जागा, कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) पदाच्या ४९ जागा, कॉन्स्टेबल (बार्बर) पदाच्या ४९ जागा, कॉन्स्टेबल (माळी) पदाच्या ७ जागा, टेलर (ग्रेड-III) पदाच्या २० जागा आणि कोबलर (ग्रेड-III) (Cobbler) पदाच्या २२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता & शारीरिक कार्यक्षमता – (१) खुल्या/ इतर मागासवर्गीय पुरुष उमेदवाराची उंची १६५ (सेंमी) आणि अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांची १६० (सेंमी) तसेच खुल्या/ इतर मागासवर्गीय महिला उमेदवाराची उंची १५७ (सेंमी) आणि अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील महिला उमेदवारांची उंची १५२ (सेंमी) असावी. (२) खुल्या/ इतर मागासवर्गीय पुरुष उमेदवाराची छाती ८०-८५ (सेंमी) आणि अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांची छाती ७६-८१ (सेंमी) असावी. (३) उमेदवाराने ९ फूट लांब उडी आणि ३ फूट उंच उडी मारणे आवशयक असून ३ मिनिट ४० सेकंद मध्ये ८०० धावणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ईएसबीसी/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});