जळगाव जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६२६ जागा
जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ६२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६२६ जागा
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (लेखा), मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषि) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.