गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३१ जागा
जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
परीक्षा फीस – ५००/- रुपये आहे.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त आणि मागासवर्गीय उमेदवाराचे वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.