युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २४६ जागा

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २४६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण २४६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. (खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार किमान ५०% गुणांसह व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.) आणि संबंधित ट्रेडमध्ये एनसीव्हीटीमधून ६०% गुणांसह व्यावसायिक प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2019 रोजी किमान 18 वर्ष आणि कमाल 25 वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती/ ओबीसी (नॉन क्रेमिलियर) उमेदवारांच्या शासकीय मार्गदर्शक सूचनेनुसार उच्च वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येईल.

अर्ज करण्याचा पत्ता –  उप जनरल मॅनेजर (इंस्टेट/ पेपर्स आणि आयआरएस), यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट. जादूगुडा माइन्स, जि. सिंहभूम (पूर्व ), झारखंड, पिनकोड- ८३२१०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर  २०१९ आहे.

 

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});