पुणे येथील राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखाती दिनांक ३ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
वरिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहाय्यक आणि यंग प्रोफेशनल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – वरिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता पुरुष उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे व महिला उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे, तर संशोधन सहाय्यक व यंग प्रोफेशनल-II पदाकरिता उमेदवाराचे वय २१ ते ४० वर्षादरम्यान असावे

मुलाखतीचा पत्ता – आयसीएआर राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पी. बी. नं. ३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे, पिनकोड-४१२३०७

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९:३० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.