राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात सल्लागार पदाच्या २४५ जागा

राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका अभियान कक्षामध्ये प्रभागसंघ सल्लागार पदाच्या जागा ११ महिन्याच्या करार तत्वावर निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रभागसंघ सल्लागार पदाच्या २४५ जागा
सिंधुदुर्ग जिल्हा १९ जागा, नाशिक जिल्हा ३ जागा, नंदुरबार जिल्हा २२ जागा, बीड जिल्हा १० जागा, चंद्रपूर जिल्हा १३ जागा, गडचिरोली जिल्हा १९ जागा, गोंदिया जिल्हा १७ जागा, जालना जिल्हा २३ जागा, उस्मानाबाद जिल्हा २० जागा, रत्नागिरी जिल्हा २२ जागा, ठाणे जिल्हा ९ जागा, वर्धा जिल्हा २४ जागा, यवतमाळ जिल्हा २४ जागा आणि पालघर जिल्हा १४ जागा

अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ मार्च २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

संक्षिप्त जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा 

 

 

Comments are closed.