महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांच्या ८६५ जागा (मुदतवाढ)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील वर्ग क आणि ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तत्सम अर्हता धारण केली असावी.
कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा तत्सम अर्हता धारण केली असावी.
लघुलेखक (निम्न श्रेणी) पदाच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि मराठी लघुटंकलेखक १०० प्र.श.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० प्र.श.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावा.
वरिष्ठ लेखापाल पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
सहाय्यक पदाच्या ३१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा आणि दोन वर्षात MS-CIT उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
लिपिक टंकलेखक पदाच्या २११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा आणि मराठी ३० प्र.श.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० प्र.श.मि. वेगाची परीक्षा आणि MS-CIT उत्तीर्ण असावा.
भूमापक पदाच्या २९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वाहनचालक पदाच्या २९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता सातवी उत्तीर्णसह हलके अथवा जड वाहन चालविण्याचा परवाना आणि २ वर्षाचा अनुभव धारक असावा.
तांत्रिक सहाय्यक पदाच्या ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभ्यासक्रम अथवा स्थापत्य/ अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्याक्रम परीक्षा उत्तीर्ण असावा.
जोडारी पदाच्या ४१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारक असावा.
पंपचालक पदाच्या ७९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारक असावा.
विजतंत्री पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे प्रमाण धारक असावा.
शिपाई पदाच्या ५६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता ४ थी उत्तीर्ण आणि मराठी लिहिता, वाचता येणे आवश्यक आहे.
मदतनीस पदाच्या २७८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता ४ थी उत्तीर्ण आणि मराठी लिहिता, वाचता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०१९ (रात्री ११:५९ पर्यंत आहे.)
अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.