नंदुरबार आदिवासी विभागात विविध कंत्राटी पदांच्या एकूण १२ जागा

आदिवासी विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १२ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

संशोधन सहाय्यक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांचे पुरेशे ज्ञान आणि संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेतून कामकाज करता येणे आवशयक आहे.
मुलाखत – गुरुवार, दिनांक २४ जानेवारी २०१९, दुपारी १२ वाजता.

निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. मराठी ३० प्र.श.मि. आणि इंग्रजी ४० प्र.श.मि. टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेतून कामकाज करता येणे आवशयक आहे.
मुलाखत – मंगळवार, दिनांक २२ जानेवारी २०१९, दुपारी १२ वाजता.

विधी अधिकारी पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर आणि सनदधारक असावा. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांचे पुरेशे ज्ञान आणि मा. उच्च न्यायालयांसाठी काम करण्याची क्षमता असावी.
मुलाखत – बुधवार, दिनांक २३ जानेवारी २०१९, दुपारी १२ वाजता.

विधी सहाय्यक पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर आणि सनदधारक असावा. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांचे पुरेशे ज्ञान आणि आणि मा. उच्च न्यायालयांसाठी काम करण्याची क्षमता असावी. तसेच संगणक हाताळण्याची क्षमता असावी.
मुलाखत – बुधवार, दिनांक २३ जानेवारी २०१९, दुपारी २ वाजता.

कनिष्ठ लिपिक/ लघुटंकलेखक पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन ६० श.प्र.मि. टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच मराठी ३० प्र.श.मि. आणि इंग्रजी ४० प्र.श.मि. टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असावा. संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेतून कामकाज करता येणे आवशयक आहे.
मुलाखत – शुक्रवार, दिनांक २५ जानेवारी २०१९ दुपारी १२ वाजता

मुलाखतीचे स्थळ – अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, साक्री रोड, आरटीओ ऑफिस जवळ, नंदुरबार.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

संक्षिप्त जाहिरात पहा

सविस्तर जाहिरात पहा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter