राज्य परीक्षा परिषदेची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2019) जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ (MAHATET) ही परीक्षा रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९
शैक्षणिक पात्रता – इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर- पहिला) करिता इय्यता बारावी (५०% गुणांसह) उत्तीर्ण आणि डी.टी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता सहावी ते आठवी (पेपर-दुसरा) करिता इय्यता बारावी (५०% गुणांसह) उत्तीर्णसह आणि बी.ए.बी.एड. किंवा बी.एस्सी.बी.एड.उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा फीस – इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर- पहिला) करिता ५००/- रुपये आणि इयत्ता सहावी ते आठवी (पेपर-दुसरा) करिता ८००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी (पेपर- पहिला) करिता २५०/- रुपये आणि (पेपर-दुसरा) करिता ४००/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – दिनांक ४ जानेवारी २०२० पासून ऑनलाईन उपलब्ध होतील.

परीक्षा – दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:३० ते १:०० दरम्यान पहिला पेपर आणि दुपारी २:०० ते ४:३० दरम्यान दुसरा पेपर घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});