इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या वैद्यकीय विभागात ७७० जागा

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ७७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुपर स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवीसह डी.एम.किंवा एम.सीएच आणि संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० मे २०१९ रोजी ५० वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या २१० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा आणि संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० मे २०१९ रोजी ४० वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ५५६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मेडिसिन ॲलोपॅथिक सिस्टम वैद्यकीय पात्रता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० मे २०१९ रोजी ३० वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मे २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

शुध्दीपत्रक डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Visit us nmk.co.in

Comments are closed.