छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विविध पदाच्या २१८ जागा

छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, लि. गेवराई यांच्या माजलगाव, गेवराई, बीड, केज, टाकरवन, केज आणि भूम (उस्मानाबाद) शाखांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून पदांनुसार पात्रताधारक उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

शाखा व्यवस्थापक पदाची १ जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग किंवा क्रेडिट सोसायटीमधील ४ ते ५ वर्षाचा अनुभव धारक असावा. (शाखा – माजलगाव)

पासिंग ऑफिसर पदाची १ जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर बँकिंग किंवा क्रेडिट सोसायटीमधील २ ते ३ वर्षाचा अनुभव धारक असावा. (शाखा – माजलगाव)

क्लार्क/ कॅशिअर पदाच्या १० जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग किंवा क्रेडिट सोसायटीमधील किमान १ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (शाखा – बीड, माजलगाव, केज)

क्लार्क/ लिपिक पदाच्या ६ जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग किंवा क्रेडिट सोसायटीमधील किमान १ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (शाखा – गेवराई, टाकरवन)

पिग्मी प्रतिनिधी पदाच्या २०० जागा
पात्रता – उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (शाखा – गेवराई, टाकरवन, बीड, माजलगाव, केज, भूम)

मुलाखतीचे स्थळ – मुख्य कार्यालय, जुन्या बस स्टॅन्ड जवळ, जालना रोड, गेवराई.

मुलाखतीची तारीख/ वेळ – १२ एप्रिल २०१९ (सकाळी ११ ते ५ दरम्यान)

सूचना – अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी किंवा ७०६६६६४४४६ वर संपर्क साधावा.

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

 

Visit us www.nmk.co.in

Comments are closed.

Visitor Hit Counter