मुंबई उच्च न्यायालयात कनिष्ठ/ वरिष्ठ लघुटंकलेखक पदाच्या ३४ जागा

मुंबई उच्च न्यायालय यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लघुटंकलेखक पदाच्या निवड यादी/ प्रतीक्षा यादी प्रत्येकी १० जागा आणि कनिष्ठ लघुटंकलेखक पदाच्या निवड यादी/ प्रतीक्षा यादी प्रत्येकी ७ जागा अशा एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लघुटंकलेखक (कनिष्ठ/ वरिष्ठ) पदाच्या ३४ जागा
वरिष्ठ लघुटंकलेखक पदाच्या १०+१० जागा आणि कनिष्ठ लघुटंकलेखक पदाच्या ७+७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने सरकारी परीक्षा मंडळ किंवा आय.टी.आय. ने घेतलेली वरिष्ठ लघुटंकलेखक पदासाठी १०० प्र.मि.श. टंकलेखन परीक्षा आणि ४० प्र.मि.श. लघुटंलेखन व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा आणि कनिष्ठ लघुटंकलेखक पदांसाठी ८० प्र.मि.श. लघुटंकलेखन किंवा इंग्रजी लघुलेखन आणि ४० प्र.मि.श. इंग्रजी टंकलेखन व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ११ सप्टेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – २००/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


सौजन्य: श्री मल्टी सर्विसेस, औरंगाबाद.


 

Comments are closed.