पुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कंत्राटी पदांच्या एकूण २४८ जागा
लेखापाल पदाच्या ३ जागा, तालुका समुह संघटक पदाची १ जागा, समुपदेशक पदाच्या २७ जागा, वैद्यकीय अधिकारी पदाच्या २१ जागा, वैद्यकीय अधिकारी पदाच्या ४२ जागा, ऑप्टोमेट्रिस्ट पदाच्या २ जागा, औषध निर्माता पदाच्या २२ जागा, फिजिओथेरेपिस्ट पदाच्या ३ जागा, मनोचिकित्सक स्टाफ नर्स पदाची १ जागा, सामाजिक कार्यकर्ता पदाची १ जागा, स्टाफ नर्स पदाच्या ११२ जागा, सांख्यिकी अन्वेषक पदाच्या २जागा, अतिविशेष तज्ञ पदाच्या २ जागा आणि इतर पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम आणि टॅली (Tally) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह मराठी/ इंग्रजी टायपिंग अनुक्रमे ३०/ ४० श.प्र.मि.आणि MS-CIT तसेच १ वर्ष अनुभव किंवा ऑप्टोमेट्री पदवीसह १ वर्ष अनुभव किंवा एमबीबीएस किंवा पदव्युत्तर पदवी (आयुष) आणि २ वर्ष अनुभव किंवा पदविका (आयुष) किंवा बीएएमएस किंवा बी.फार्म/डी.फार्म आणि १ वर्ष अनुभव किंवा फिजिओथेरेपी पदवी आणि १ वर्ष अनुभव किंवा जीएनएम/ बी.एस्सी.(नर्सिंग) किंवा डीपीएन किंवा सांख्यिकी/ गणित पदवी आणि MS-CIT आणि डीएमएलटी आणि १ वर्ष अनुभव किंवा डीएम (कार्डियोलॉजी)/ जीएम (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय एमबीबीएस/ स्पेशालिस्ट पदांसाठी ७० वर्ष आणि नर्स/ टेक्निशिअन पदांसाठी ६५ वर्ष तसेच इतर पदांसाठी ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारसांठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – पुणे जिल्हा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, चौथा मजला, जिल्हा परिषद, पुणे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ३० जुलै २०१९ आहे.
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात पाहा अर्जाचा नमुना पाहा
Comments are closed.