मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३८ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत येणाऱ्या धुळे, नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत व बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, प्रसूतितज्ज्ञ/ स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८ जागा
बालरोगतज्ञ, प्रसूतितज्ज्ञ/ स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, एएनएम आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तसेच संबंधित तारखेस स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे.

मुलाखतीचा/ अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, मालेगाव महानगरपालिका, रामसेतु जवळ, मालेगाव, जि. नाशिक, पिनकोड- ४२३२०३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.