भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात विविध पदांच्या एकूण ७ जागा

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (लॅब), कनिष्ठ इनव्हिस्टीगेटर आणि अप्पर डिव्हिजन लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (लॅब) व अप्पर डिव्हिजन लिपिक पदाकरिता १९ वर्ष ते २५ वर्ष तसेच कनिष्ठ इनव्हिस्टीगेटर पदाकरिता २२ वर्ष ते २८ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालय, पी. बाळू रोड, प्रभादेवी, मुंबई, पिनकोड- 400025

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.