बारावीचा मराठी/ हिंदी विषयाचा पेपर आता एप्रिल महिन्यात घेण्यात येणार

राज्यातील दिनांक ४ मार्च २०२२ पासून सुरू होत असलेल्या इयत्ता बारावी परीक्षांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता दिनांक ५ मार्च २०२२ रोजी नियोजित हिंदी विषयाचा पेपर आता दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी आणि दिनांक ७ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या मराठी विषयाचा पेपर आता दिनांक ७ एप्रिल होणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या वेळापत्रकात केवळ मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांचा समावेश असून नुकतीच अहमदनगर मधील संगमनेर येथे १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.


Comments are closed.