कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७७१ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) यांच्या आस्थापनेवरील विमा वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१८ आहे.
विमा वैद्यकीय अधिकारी (ग्रेड-बी) पदाच्या ७७१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधारक उमेदवारांकडे भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ नुसार पहिल्या किंवा द्वितीय अनुसूचीतील पात्रता किंवा भाग-२ मधील वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – १० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही (महाराष्ट्रात १०१ जागा)
परीक्षा फीस – सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ / महिला/ माजी सैनिक तसेच कार्यालयीन कर्मचारी असलेल्या उमेदवारांना २५०/- आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.