सोलापूर येथे जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या एकूण ५९ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रशासन व लेखा सहाय्यक पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally आणि ३ वर्षे अनुभव आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

शिपाई पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

प्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ३८ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – सोलापूर जिल्हा

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये, मागासवर्गीय उमेदवारांसाठी २७४/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी २३/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ आक्टोंबर २०१८ ( सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.