आता तुम्हाला फक्त १५ दिवसातच एज्युकेशन लोन (कर्ज) मिळणार..
उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असून हा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. त्यामुळे एज्युकेशन लोन हा एकच पर्याय असल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतात. एज्युकेशन लोनमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लोन दिले जाते. दरम्यान, अर्थ मंत्रालयाने एज्युकेशन लोनसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याने आता एज्युकेशन लोनची प्रक्रिया फक्त १५ दिवसांत पूर्ण होणार आहे असून अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (PSBs) शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया अजून जलद करण्याचे निर्देश दिले आहे. याचसोबत मंत्रालयाने बँकांना केंदीकृत क्रेडिट प्रणाली तयार करण्यास सांगितले असून यामुळे बँकादेखील विद्या लक्ष्मी पोर्टलशी जोडल्या जात आहेत.
आता १५ दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन..
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या सुचनेनुसार, बँका शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया जलद करत आहेत. सरकारने सार्वजनिक बँकांना शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या विद्यार्थ्यांना १ महिनाभर वाट पाहावी लागते. दरम्यान, जर कोणत्याही कारणासाठी कर्ज नाकारले गेले तर ते वरिष्ठ अधिकारीच मंजूर करु शकतात आणि याबाबतची माहिती अर्जदारासोबत शेअर करावी लागणार आहे.
शैक्षणिक कर्जावरील व्याजदर किती असतील ?
सध्या देशातील खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँका ७ ते १६ टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत असून ग्रामीण बँकांमध्ये ८.५० ते १३.६० टक्क्यांनी कर्ज दिले जात आहे. देशात शिक्षण घेण्यासाठी ५० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते तर परदेशात अभ्यासक्रम करण्यासाठी १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध असून हे कर्ज पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमांसाठी दिले जाते आणि हे कर्ज तुम्हाला १५ वर्षांच्या कालावधीत परतफेड करता येईल.
सरकारची विद्या लक्ष्मी योजना कार्यरत..
सरकारची एज्युकेशन लोनसाठी विद्या लक्ष्मी योजना आहे. या योजनेत तुम्हाला एज्युकेशन लोन मिळते. यामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी विविध बँकांककडून घेतलेल्या कर्जाबद्दल माहिती मिळवू शकतात. तुलनादेखील करु शकतात आणि अर्जदेखील करु शकतात.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!