केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या एकूण १३१४ जागा

भारत सरकारच्या गृह मात्रालायाच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय औद्योगिक पोलिस दल (CISF) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector) पदांच्या एकूण १३१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे.

सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या १३१४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ४० वर्ष आहे.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उमेदवाराने संबंधित युनिटच्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.