भारतीय निर्यात-आयात (एक्झिम) बँकेत विविध पदांच्या एकूण २२ जागा

भारतीय निर्यात-आयात बँक असलेल्या एक्झिम बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

चीफ मॅनेजर(लीगल) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह विधी (कायदा) पदवी आणि १० वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असावे.

मॅनेजर (लीगल) पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह विधी (कायदा) पदवी आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी. ई./ बी.टेक./ एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इन्फॉर्मेशन सिक्योरिटी)/ एमसीए आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

मॅनेजर राजभाषा पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

डेप्युटी मॅनेजर (आयटी विकसक) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता –  उमेदवार ५०% गुणांसह बी. ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) / एमसीए आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.

डेप्युटी मॅनेजर (लीगल) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह विधी (कायदा) पदवी आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.

डेप्युटी मॅनेजर (राजभाषा) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.

एडमिन ऑफिसर (गोपनीय) पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.

आयटी ऑफिसर पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह बी.ई./ बी.टेक./ एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स) किंवा एमसीए आणि ५ वर्षे अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

सवलत – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील  उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹ ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी  ₹ १००/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक १५ मार्च २०२० रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ७ फेब्रवारी २०२० पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});