आगामी तलाठी भरतीकरिता एकूण ३६२८ पदे भरण्यास शासन मान्यता

राज्यात तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या ३११० जागा आणि मंडळ अधिकारी पदांच्या ५९८ जागा अशी एकूण ३६२८ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली असून सदरील भरती प्रक्रिया राबविण्याकरिता सदरील पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

सदरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालील प्रमाणे विभागनिहाय/ जिल्हानिहाय पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

तलाठी/ मंडळ अधिकारी पदांच्या ३६२८ जागा

पुणे विभाग – पुणे जिल्ह्यात ३८६ जागा, सातारा जिल्ह्यात ८९ जागा, सांगली जिल्ह्यात ६१ जागा, सोलापूर जिल्ह्यात १३० जागा आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३६ जागा असे एकूण ७०२ जागा

अमरावती विभाग – अमरावती जिल्ह्यात ४० जागा, अकोला जिल्ह्यात ९ जागा, यवतमाळ जिल्ह्यात ६३ जागा आणि बुलढाणा जिल्ह्यात १२ जागा असे एकूण १२४ जागा

नागपूर विभाग – नागपूर जिल्ह्यात ११० जागा, वर्धा जिल्ह्यात ५८ जागा, भंडारा जिल्ह्यात ४४ जागा, गोंदिया जिल्ह्यात ५७ जागा, चंद्रपूर जिल्ह्यात १५६ जागा आणि गडचिरोली जिल्ह्यात १३३ जागा असे एकूण ४५८ जागा

औरंगाबाद विभाग – औरंगाबाद जिल्ह्यात १३६ जागा, जालना जिल्ह्यात ९३ जागा, परभणी जिल्ह्यात ८९ जागा, हिंगोली जिल्ह्यात ७१ जागा, नांदेड जिल्ह्यात ९८ जागा, लातूर जिल्ह्यात ४६ जागा, बीड जिल्ह्यात १६१ जागा आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११५ जागा असे एकूण ७९९ जागा

नाशिक विभाग – नाशिक जिल्ह्यात २०४ जागा, धुळे जिल्ह्यात १९४ जागा, जळगाव जिल्ह्यात १७० जागा आणि अहमदनगर जिल्ह्यात २३६ जागा असे एकूण ८०४ जागा

कोकण विभाग – मुंबई (शहर) मध्ये २३ जागा, मुंबई (उपनगर) मध्ये ३४ जागा, ठाणे जिल्ह्यात ८२ जागा, पालघर जिल्ह्यात १०२ जागा, रायगड जिल्ह्यात १६२ जागा, रत्नागिरी जिल्ह्यात १२१ जागा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११७ जागा असे एकूण ६५१ जागा

सदरील पदांचा सविस्तर तपशील पाहण्यासाठी कृपया शासन निर्णय डाऊनलोड करून पाहावा

शासन आदेश पाहा येथे क्लिक करा
अप्लिकेशन डाऊनलोड करा येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनल जॉईन करा येथे क्लिक करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});