औरंगाबाद मृद व जलसंधारण विभागात गट-ब संवर्गातील २८२ जागा
आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब या संवर्गातील पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब पदाच्या २८२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य अर्हता (मूळ जाहिरात) धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष आणि मागासवर्गीय/ खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्ष तसेच अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना १५०/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ डिसेंबर २०१८ पासून आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ११:३० पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.