पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर मदतनीस पदाच्या एकूण ५० जागा
पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल कार्यालयाच्या आस्थापनेवर मदतनीस पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
मदतनीस पदाच्या एकूण ५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी (राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र) सहा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शाररिक पात्रता – उमेदवारीची उंची ५ फूट ६ इंच, छाती ३२-३४ इंच आणि किमान वजन ५० किलोग्रॅम असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – पुणे
परीक्षा फीस – नाही
अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य अग्निशमन अधिकारी यांचे कार्यालय, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, महात्मा फुले पेठ, टिंबर मार्केटजवळ, पुणे- ४११०४२ येथे समक्ष सादर करावा. (पोस्टद्वारे प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.