जिल्हा परिषद भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ग्रामविकास खात्याचा निर्णय

राज्यातील जिल्हा परिषदांमधील १३५१४ पदांची २०१९ मधील चालू असलेली भरती रद्द करण्यात आली असून अर्जदारांच्या तपशीलामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ही परीक्षा रद्द करून भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याकडून घेण्यात आला आहे.

विविध अठरा सवर्गांतील गट-क पदांच्या एकूण १३ हजार ५१४ पदांसाठीची भरती प्रक्रिया मार्च- २०१९ मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांमुळे ही भारती प्रक्रिया पुढे ढकलली जात होती. सुरवातीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचार संहिता जाहीर झाली. त्यानंतर कोरोना संकट समोर आलं त्यानंतर ACBC च्या आरक्षणाचा घोळ झाला होता. या वेगवेगळ्या कारणांमुळे ही भारती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आताही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून अनेक तरूणांनी वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केलेले आहेत. आता ग्रामविकास खात्याने परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले असून त्याचबरोबर परीक्षा शुल्क परत देण्याचे सांगण्यात आले असल्याचे वृत्त दैनिक सकाळ प्रसिद्ध केले आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.