मृद व जलसंधारण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६७० जागा

महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या एकूण ६७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण ६७० जागा
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) करीता उमेदवाराने तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा पदवी किंवा त्यास समकक्ष अर्हता धारण केलेली असावी. (शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

वयोमर्यादा –उमेदवारांचे वय किमान १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय, दिव्यांग/ पात्र खेळाडू/ अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी ४५ वर्षांपर्यंत सवलत आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.