स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या जागा

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) पदांसाठी पुरुष उमेदवारांकडे शारीरिक सहनशक्ती आणि मापन चाचण्यांसाठी निश्चित तारखेला हलके वाहन (मोटरसायकल आणि कार) वैध वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी २० ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदरांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्ण पणे सवलत.)

परीक्षा – पहिला पेपर दिनांक ११ ते १३ डिसेंबर २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ आहे. (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.