भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर ग्रुप-डी पदांच्या एकूण १०३७६९ जागा

भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध ग्रुप-डी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध ग्रुप-डी पदांच्या एकूण १०३७६९ जागा
सहायक (कार्यशाळा) पदाच्या ११२६८ जागा, सहाय्यक (ब्रिज) पदाच्या ९३ जागा, सहायक (C & W) पदाच्या ७२८४ जागा, सहायक (डेपो/ स्टोअर) पदाच्या १६९४ जागा, सहाय्यक लोको (शेड/ डीझेल) पदाच्या २२०४ जागा, सहाय्यक लोको (शेड/ इलेक्ट्रिकल) पदाच्या ११७२ जागा, सहाय्यक (ऑपरेशन्स/ इलेक्ट्रिकल) पदाच्या ७८८ जागा, सहाय्यक पुरुष (पॉइंट) पदाच्या १४८७० जागा, सहाय्यक (सिग्नल आणि दूरसंचार) पदाच्या ५४८८ जागा, सहायक (ट्रॅक मशीन) पदाच्या ३१५७ जागा, सहायक (TL & AC) पदाच्या ३६३३ जागा, कार्यशाळा सहाय्यक (TL & AC) पदाच्या १७९८ जागा, सहाय्यक (TRD) पदाच्या ३०१४ जागा, सहाय्यक (कार्य) पदाच्या ४१०९ जागा, कार्यशाळा सहायक (कार्य) पदाच्या ४०३ जागा, सहाय्यक (हॉस्पीटल) पदाच्या १३०२ जागा, ट्रॅक मेन्टेनर (चतुर्थ श्रेणी) पदाच्या ४०७२१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्णसह संबंधित आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गतील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक मागास/ तृतीय पंथी/ अल्पसंख्याक/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

परीक्षा – सप्टेंबर-ऑक्टोबर- २०१९ मध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) घेण्यात येईल.

अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ मार्च २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ एप्रिल २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.