नेहरू युवा केंद्र संघटनेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३७ जागा (मुदतवाढ)

भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये विविध पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३७ जागा
सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक पदाच्या १६० जागा, ज्युनिअर कॉम्पुटर प्रोग्रामर पदाच्या १७ जागा, वरिष्ठ हिंदी अनुवादक पदाची १ जागा, सहाय्यक पदाच्या ३८ जागा, ग्रंथपाल पदाची १ जागा, ६ स्टेनोग्राफर पदाच्या २३ जागा, संगणक चालक पदाच्या ४ जागा, लेखा लिपिक सह टंकलेखक पदाच्या ५८ जागा, निम्नश्रेणी लिपिक पदाच्या १२ जागा आणि मदतनीस (बहुउद्देशीय) पदाच्या २३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे. (मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्ष किंवा २७ वर्ष किंवा २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

फीस – खुल्या/ आर्थिक मागास/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि महिला उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचीत जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत देण्यात येत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.