राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विविध पदाच्या एकूण २४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य आरोग्य संस्था, महाराष्ट्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा खाते व्यवस्थापक पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सीए/ आयसीडब्ल्यूए किंवा बी.कॉम. आणि एमबीए (फायनांस) किंवा एम.कॉम. आणि Tally तसेच २ वर्षे अनुभव धारक असावा.

अर्थसंकल्पीय व वित्त अधिकारी पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सीए/ आयसीडब्ल्यूए किंवा बी.कॉम. आणि एमबीए (फायनांस) किंवा एम.कॉम. आणि Tally तसेच ३ वर्षे अनुभव धारक असावा.

अकाउंटंट (डीईओ) पदाच्या एकूण ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम./ एम.कॉम. आणि Tally उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय ३८ वर्ष पेक्षा जास्त आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे वय ४३ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, वर्धा, गोंदिया, पुणे, नंदुरबार, परभणी, सोलापूर, बीड आणि रत्नागिरी जिल्हा.

परीक्षा फीस – नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commissioner, Health Services and Mission Director, National Health Mission, Arogya Bhavan, 3rd floor, St. George’s Hospital Compound, P.D’Mello Road, Mumbai. Pin: 400001.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ आहे. (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्ज डाऊनलोड करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});