महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-अ आणि गट-ब संवर्गातील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा (पूर्व) परीक्षा- २०१९ रविवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

गट-अ आणि गट-ब संवर्गातील विविध पदाच्या एकूण ३६० जागा
उप जिल्हाधिकारी (गट-अ) पदाच्या ४० जागा, पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या ३१ जागा, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ) पदाच्या १६ जागा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी पदाच्या २१ जागा, तहसीलदार (गट-अ ) पदाच्या ७७ जागा, उपशिक्षणाधिकारी (शिक्षणसेवा) (गट-ब) पदाच्या २५ जागा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-ब) पदाच्या ३ जागा, कक्ष अधिकारी (गट-ब) पदाच्या १६ जागा, सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) पदाच्या ११ जागा, उद्द्योग अधिकारी (तांत्रिक) पदाच्या ५ जागा आणि नायब तहसीलदार (गट-ब) पदाच्या ११३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा राज्य शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता धारण केलेली असावी. तसेच सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ) पदासाठी वाणिज्य पदवी ५५ टक्के गुणांसह किंवा समतुल्य अर्हता आणि उद्द्योग उप संचालक (तांत्रिक) (गट-अ) पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानांमधील पदवी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-ब) पदासाठी भौतिकशाश्त्र आणि गणित विषयांसह अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी. (अधिक/ अचूक माहितीसाठी जाहिरात पहावी.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष आणि माजी सैनिक/ अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जानेवारी २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी  कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

शुद्धीपत्रक डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.