गडचिरोली आदिवासी विकास विभागात शिक्षक पदाच्या एकूण २३ जागा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या आस्थापनेवर शिक्षक पदाच्या  एकूण २३ जागा भरण्यासाठी  पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० प्रती/ तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक/ महिला उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 


 

Comments are closed.