आयबीपीएस मार्फत विविध विशेष अधिकारी पदाच्या एकूण १५९९ जागा

देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील विविध विशेष अधिकारी पदाच्या एकूण १५९९ जागा भरण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षा २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

माहिती तंत्रज्ञानशास्त्र अधिकारी (वर्ग-१) पदाच्या २१९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई/ बी.टेक किंवा पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान/ संगणक अनुप्रयोग/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन) अर्हताधारक असावा.

कृषी अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण ८५३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषि/ फळबाग/ पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशाळा विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषि विपणन आणि सहकारिता/ सहकार व बँकिंग/ वृक्षारोपण व वृक्षसंगोपन शास्त्र/ कृषि जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ शेती व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ डेअरी तंत्रज्ञान/ शेती अभियांत्रिकी पदवीधारक असावा.

अधिकृत भाषा अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण ६९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवीधारक असावा.

कायदा अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण ७५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एल.एल.बी (कायदा) पदवीधारक असावा.

मानव संसाधन अधिकारी (वर्ग-१) पदाच्या ८१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवीधर किंवा पर्सनल मॅनेजमेंट/ औद्योगिक व्यापार/ मानव संसाधन/ मानव संसाधन विकास/ सामाजिक कार्य/ कामगार कायदा पदव्युत्तर पदविका धारण केलेली असावी.

मार्केटिंग अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण ३०२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक (एमएमएस/ एमबीए (मार्केटिंग)/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ पीजीपीएम/ पीजीडीएम) असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०१८ रोजी २० ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना १००/- रुपये आहे.

परीक्षा – २९, ३० डिसेंबर २०१८ रोजी पूर्व परीक्षा आणि २७ जानेवारी २०१९ रोजी मुख्यपरीक्षा घेण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – ६ नोव्हेंबर २०१८ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});