केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ४२९ जागा

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ४२९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ४२९ जागा
पुरुष ३२८, महिला ३७ आणि एलडीसीई ६४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

शारीरिक पात्रता – खुल्या/ अनुसूचित जाती/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष उमेदवाराची उंची किमान १६५ सेंमी. आणि छाती किमान ७७ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त) असावी व महिला उमेदवाराची उंची किमान १५५ सेंमी. असावी. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील पुरुष उमेदवाराची किमान उंची १६२.५ सेंमी आणि छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त) असावी व महिला उमेदवाराची किमान उंची १५० सेंमी असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter