बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात समन्वयक पदाच्या ४१ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उप कार्यकारी कार्यकारी अधिकारी (कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन) विभागाच्या आस्थापनेवरील समन्वयक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
समन्वयक पदाच्या एकूण ४१ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्णसह स्वच्छता निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण आणि MS-CIT किंवा समतुल्य कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – १ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – मुंबई
परीक्षा फीस – नाही
अर्ज सादर करण्याचा पत्ता – उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी (कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन) यांचे कार्यालय, रुम न.१३, पहिला मजला, एफ/ दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई- ४०००१२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ते २७ सप्टेंबर २०१८ आहे. (सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.