भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ४०० जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या एकूण ४०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०० जागा
फिटर ट्रेडच्या १५० जागा, वेल्डर ट्रेडच्या ११० जागा, टर्नर ट्रेडच्या ११ जागा, मशीनिस्ट ट्रेडच्या १६ जागा, इलेक्ट्रिशिअन ट्रेडच्या ३५ जागा, वायरमन ट्रेडच्या ७ जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडच्या ७ जागा, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक ट्रेडच्या ७ जागा, एसी & रेफ्रिजरेशन ट्रेडच्या १० जागा, डिझेल मेकॅनिक ट्रेडच्या ७ जागा, शीट मेटल वर्कर ट्रेडच्या ५ जागा, पीएएसएए ट्रेडच्या २० जागा, कारपेंटर ट्रेडच्या ४ जागा, प्लंबर ट्रेडच्या ४ जागा, एम.एल.टी.(पॅथॉलॉजी) ट्रेडच्या २ जागा आणि सहाय्य्क (HR) पदाच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – वायरमन पदासाठी आठवीसह आणि आयटीआय (वायरमन) उत्तीर्ण, प्लंबरसाठी आठवीसह आयटीआय (प्लंबर) उत्तीर्ण, एमएलटी (पॅथॉलॉजी) करिता बारावी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) विषयसह उत्तीर्ण, सहाय्यक (HR) करिता बी.ए. (Bachelor Degree in Business Administration) उत्तीर्ण आणि उर्वरित ट्रेडकरिता दहावीसह उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १३ एप्रिल २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter