वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच काही पदांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
सुपर विशेषज्ञ, एमडी रेडिओलॉजी, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स सुपरवायझर, फार्मासिस्ट आणि एलएचव्ही पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 15 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.

मुलाखतीची वेळ  – प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा आरोग्य कार्यालय, वर्धा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter