सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १०१ जागा

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०१ जागा
वैद्यकीय अधिकारी (पीजी) आयुष, वैद्यकीय अधिकारी (यूजी) आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी (यूजी) आयुष, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, कार्यक्रम व्यवस्थापक (सार्वजनिक आरोग्य), फिजिओथेरपिस्ट, पर्यवेक्षक, टीबी पर्यवेक्षक, कार्यक्रम समन्वयक, डायलिसिस तंत्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी), स्टाफ नर्स, शितसाखळी तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जून २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.