पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४५ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, दंतशल्यचिकित्सक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फैमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सव्र्व्हे नं. ७७०/३, बाकरे अॅव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे, पिनकोड- ४११००५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.