महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा- २०२० शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली होती, तथापि प्रस्तुत परीक्षा रविवार दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात घेणार असल्याचे आयोगाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले असून १४ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या परीक्षाकरीता डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्राच्या आधारेच नमूद केलेल्या परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे.

तसेच दिनांक शनीवर दिनांक २७ मार्च २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- २०२० आणि रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा- २०२० या दोन परीक्षा नियोजित दिनांकास घेतल्या जाणार असून त्यामध्ये कुठलाही बदल करण्या आला नसल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.

 

प्रसिद्धीपत्रक पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.