लोकसेवा आयोगामार्फत पोलीसांकरिता उपनिरीक्षक पदांच्या २५० जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमधून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा- २०२१ मध्ये सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा- २०२१
पोलीस उपनिरीक्षक अराजपत्रित (गट-ब) पदाच्या २५० जागा
शैक्षणिक पात्रता – सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक किंवा पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचारी म्हणून कार्यरत असणे आवश्यक असून पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी ४ वर्ष नियमित सेवा तर दहावी, बारावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी किमान पाच वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १५ ते २९ जून २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.