राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यात उमेदवारांमध्ये उद्रेक उसळला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १२ मार्च रोजी नियोजित असलेली राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२० कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली असून या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्ह्यात निर्बंध लावलेले असल्याने विविध जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेणे शक्य नसल्याने प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येणार आहे, असे आयोगाचे सहसचिव यांनी सदरील परिपत्रकात म्हटले आहे. यापूर्वीच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर पुन्हा अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी पाहावयास मिळत असून पुण्यात याचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला असून संतप्त उमेदवारांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करत परीक्षा रद्द न करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

 

प्रसिद्धीपत्रक पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.