महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी पदांच्या एकूण ११४५ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदांच्या एकूण ११४५ जागा भरण्यासाठी दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभाही होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९
सहायक अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी अर्हता धारक आणि पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १९ वर्ष ते ३३ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदारांसाठी ४३ वर्ष आहे.)
परीक्षा शुल्क – अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
स्थापत्य जाहिरात इलेक्ट्रिकल जाहीरात
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.