बोगस भरतीच्या विरोधात न्यायालयीन लढाईकरिता आर्थिक मदतीचे आवाहन

आरोग्य विभागाच्या निकालानंतर सदरील भरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं पुन्हा स्पष्ट झालं असून महा-आयटी किंवा त्या अधिनस्त असलेल्या खासगी कंपन्या नोकरभरती पारदर्शकपणे करण्याची शाश्वती नसून भाजप सरकारच्या काळातील “महापरिक्षा पोर्टल” व आताच्या सरकारने निवडलेल्या आयटी कंपन्या तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्ट असल्याचे सिद्ध झाले असून  विरोधात न्यायालयात दाद मागणीसाठी अर्थीक मदत करण्याचे आवाहन समन्वय समिती करत आहे.

महापरीक्षा पोर्टल विरुद्ध पहिली केस जिंकणारे आणि या विषयात तज्ञ असलेले सर्वोच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांच्या मार्फत आपण उच्च न्यायालयात आरोग्य भरती रद्द करण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी याचिका दाखल करणार आहोत. त्यासाठी मागील काही दिवसापासून आरोग्य विभातील घोटाळ्यांचे पुरावे बाहेर काढण्यात समन्वय समिती व्यस्त असून त्याबाबत आम्ही एक ठोस पुराव्यासह रिपोर्ट बनविला असून तो कोर्टात लवकरच सादर करणार असून आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ती परीक्षा आणि इतर गट-क व गट-ड संवर्गातील पदांच्या परीक्षा MPSC मार्फतच घेण्याची मागणी याचिकेत करणार आहोत. आमच्याकडे भरतीत घोटाळा झाल्याचे ठोस पुरावे असून महापरिक्षा पोर्टल मध्ये झालेल्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीही याचिकेत असणार आहे.

आगामी काळात होणाऱ्या सर्व गट-क ते गट-ड च्या स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती,जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, शिक्षक भरती परीक्षांचे भवितव्य या याचिकेमुळे ठरणार असून आपण परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी आज हजारो रुपये खर्च केले असतील, आमच्या संघटनेने एकाही विद्यार्थ्यांकडून आजवर एकही रुपयाची मागणी केलेली नाही, परंतु आज ही केस लढण्यासाठी खरी पैश्याची गरज असल्याने आपण सर्वांनी आपल्या स्वच्छेने किमान ५००/- किंवा १०००/- रुपये मदत करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र एमपीएससी समन्वय समिती करत असून सदरील रक्कम खालील बँक अकाऊंट मध्ये अथवा गुगल-पे द्वारे जमा करता येईल.

गुगल-पे नंबर :- 9767678267

नाव :- राहुल कवठेकर
बँक :- स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक अकाऊंट नंबर :- 62130144704
IFSC कोड :- SBIN0020027

सदरील याचिकेत पुढील प्रमाणे मागण्या करण्यात येतील.

१) आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ती परीक्षा पुन्हा MPSC मार्फतच घेण्यात यावी.
२) गट-क व गट-ड संवर्गातील सर्व पदांच्या शासकीय नोकर भरत्या यापुढे MPSC मार्फतच घेण्यात याव्यात.
३) महापरिक्षा पोर्टलमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील SIT समिती मार्फत करावी.

तसेच आमचा हा संदेश आपल्या मित्र मंडळी, टेलिग्राम चॅनल्स, फेसबुक वर शेयर करून आम्हाला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, ही विनंती.

प्रेषक:-  MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.