उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा निकाल जाहीर, चेक करा आपला निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी त्यांचा बैठक क्रमांक, आईचे नाव माहिती आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवार दिनांक ५ मे २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून बारावी परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींना खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवरून विद्यार्थ्यांना सदरील निकाल पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!