भारतीय जीवन विमा महामंडळात विकास अधिकारी पदांच्या १९४२ जागा

भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (LIC) पश्चिम क्षेत्र कार्यालय, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील विविध विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (शिकाऊ) पदांच्या एकूण १९४२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

शिकाऊ विकास अधिकारी पदांच्या १९४२ जागा
विभागीय कार्यालय, अहमदाबाद- १६४ जागा, अमरावती- ६२ जागा, औरंगाबाद- ७१ जागा, भावनगर- ७४ जागा, गांधीनगर- ९३ जागा, गोवा- ६५ जागा, कोल्हापूर- ५१ जागा, मुंबई शहर- ५३९ जागा, नाडियाद- ६३ जागा, नागपूर- ९१ जागा, नांदेड- ३० जागा, नाशिक- ९३ जागा, पुणे- १२४ जागा, राजकोट- १०२ जागा, सातारा- ३६ जागा, सुरत- ९९ जागा, ठाणे- ११० जागा आणि वडोदरा- ७५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.